Ad will apear here
Next
प्रबळगड ट्रेक
गेली १५हून अधिक वर्षे सह्याद्रीतील वाटांवर सातत्याने आणि सहज भटकंती करणारे सुशील दुधाणे यांचे ‘घाट वाटा’ हे पुस्तक एक सुगम वाटाड्या म्हणून ट्रेकर्सना उपयुक्त आहे. पुणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमधील आनंददायी सफरींचे वर्णन या पुस्तकात आले आहे. रायगड जिल्ह्यातील प्रबळगडाच्या भटकंतीबद्दल मार्गदर्शन करणारे या पुस्तकातील प्रकरण येथे प्रसिद्ध करत आहोत.
........
प्रबळगड हा उत्तर कोकणातील गड, त्याच्या मुलखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यास असावा. त्याच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून ‘मुरंजन’ असे नाव दिले होते. रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यात हा गड असून, पुण्यावरून कामशेत-लोणावळा-कर्जत-बोरगाव-आंबेवाडी या मार्गाने या गडावर जाता येते.

किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड मुंबई-पुणे हमरस्त्यावरून दिसतो. पूर्वेला उल्हास नदी पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैर्ॠत्येला कर्नाळा गड आहे, तसेच जवळच असलेला इरशाळगड. 

गडांवरील गुहांच्या अभ्यासावरून त्यांचा कालखंड बौद्ध काळाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्तरकाळातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून मुरंजन असे नाव दिले. बहामनी राजवटीत हा गड आकारास आला असावा. नंतर तो अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल सम्राट शाहजहान आणि विजापूरचा आदिलशाह यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या. तेव्हा शहाजीराजे पळ काढून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. नंतर कोकणात जंजिऱ्याच्या सिद्दीकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चौलला पोर्तुगीजांकडे गेले; पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. 

१६३६मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या आदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याच वेळी म्हणजे १६५६मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादेव याने कल्याण-भिवंडीपासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलुख स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. 

गडाचे नाव बदलून प्रबळगड असे ठेवण्यात आले. पुढे १६६५मध्ये पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ गडांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने गडावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठे गड परत घेत असताना मराठ्यांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला. तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला. 

केशरसिंहाची आई व दोन मुले गडाच्या झडतीत सापडले. शिवरायांच्या आदेशानुसार त्यांना सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर गडावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली. 

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

प्रबळगडचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. गडावर एक गणेश मंदिर आहे. तसेच तीन पाण्याच्या टाक्यासुद्धा आहेत. मात्र ही टाकी शोधण्यासाठी व गडावर फिरण्यासाठी बाटल्या घेणे आवश्यक आहे. 

प्रथम इंग्रजांनी प्रबळगडचा माथेरानसारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषित करण्याचा विचार केला होता; मात्र पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे तो विचार मागे पडला. गडावर तीन-चार इमारतींचे अवशेष आहेत. घनदाट कारवीच्या जंगलामुळे गडावरील वाटा नीट दिसत नाहीत. मात्र गडावरून माथेरानचे विविध पॉइंट फार सुंदर दिसतात. 

प्रबळगडचे नाव काढताच आपल्याला लगेचच आठवतो तो त्याच्या बाजूलाच असलेला कलावंतीण दुर्ग. अवाढव्य पसारा पाहून आश्चर्यचकितच व्हायला होते. ब्रिटिशांच्या काळात वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा करता न आल्यामुळे हा परिसर थंड हवेचे ठिकाण म्हणून उदयास येता येता राहून गेला. 

या ट्रेकला जाण्यासाठी आपण पुणे-कामशेत-लोणावळा-कर्जत-बोरगाव फाटा या मार्गाने आंबेवाडीला पोहोचावे. 

आंबेवाडीतून दक्षिणेच्या बाजूने चढून उत्तरेला नेहमीच्या वाटेने ठाकूरवाडीला उतरण्याचे नियोजन करायचे. 

ट्रेक आंबेवाडीतून गाइडला घेऊन सुरू करावा. उजव्या बाजूला माथेरानची रांग, तर डाव्या बाजूला प्रबळगडाची रांग नजरेस पडते. त्याच्याही डावीकडे इरशाळगड त्याच्या विशेष आकारावरून ओळखता येतो. आंबेवाडीतून माथेरानला जाणाऱ्या बऱ्याच पायवाटा आहेत. एक वाट वरच्या टप्प्यात असलेल्या शिडीच्या वाटेने माथेरानच्या वन-ट्री हिल पॉइंटजवळ जाते, तर अजून एक बहुपरिचित वाट पिसरनाथ मंदिराजवळ निघते. सुरुवातीची थोडीशी सपाटी सोडल्यावर अध्येमध्ये लागणारे लहानमोठे, परंतु आता कोरडे पडलेले ओढे-नाले ओलांडत थोडी चढाई-उतराई करीत बऱ्यापैकी हिरव्यागार जंगलातून शेवटचा उतार उतरल्यावर साधारण तासाभरात आपण उंबरनेवाडीत पोहोचतो. येथून पुढे चांगल्या रुळलेल्या पायवाटेने चालल्यावर उजव्या बाजूला माथेरानकडे जाणारी वाट सोडून अजून पुढे एक मोठा ओढा ओलांडून सरळ वरून येणाऱ्या मोठ्या धबधब्याच्या मार्गातून चालायला सुरुवात करावी. सुरुवातीला लहानमोठ्या दगडांच्या राशीतून कधी डावी, तर कधी उजवी बाजू पकडून चालत वरवर चढू लागायचे.

अध्येमध्ये पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे तयार झालेल्या लहानमोठ्या रांजणखळग्यांमध्ये साठलेले पाणी दिसते. मध्येच एखादा अवघड रॉक लागल्यावर वाट डावीकडे गवताळ निसरड्या भागातून जाते. अध्येमध्ये वाट संपल्याचाही भास होतो. या वाटेचा वापर फार पूर्वी वाघ व इतर रानटी प्राण्यांच्या शिकारीसाठी होत होता. सध्या या वाटेने फारसे कोणी जात नाही. मोठ्या प्रमाणात ग्रुप असेल तरच या वाटेने जावे. वर्ष-सहा महिन्यांनी कधी तरी कोणी जात असल्यामुळे वाट बरीचशी बुजलेली आहे. वाटेत बऱ्याच ठिकाणी धबधब्याच्या मार्गावर साठलेले, पिण्यायोग्य स्वच्छ व थंडगार पाणी आढळून येते. 

(सुशील दुधाणे यांचे ‘घाट वाटा’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZDTCH
Similar Posts
असं हे वैशिष्ट्यपूर्ण कोल्हापूर... ‘रांगडेपणाबरोबर अंगात गुरगुर आणि मस्ती असणारी, रंगेलपणा अन् शौकीनपणाबरोबर जिवाला जीव देणारी, कौतुकाबरोबरच पाय आडवा घालून पाडण्याची तयारी असलेली, लाल मातीशी घट्ट नातं असणारी आणि ‘चैनीत’, ‘निवांत’ असे शब्द खऱ्या अर्थाने जगणारी अघळपघळ मनाची माणसं म्हटलं, की ती कोल्हापूरचीच असणार. दुसरी कुठली?’ समकालीन
नर्मदातीरी मी सदा मस्त... ‘नर्मदातीरी मी सदा मस्त’ हे सदानंद येरवडेकर यांच्या लेखणीतून उतरलेले पुस्तक आहे. त्यातून नर्मदा परिक्रमेचा इतिवृत्तांत समोर येतो. ही परिक्रमेची दैनंदिनीच असल्याने परिक्रमा करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक आदर्श वस्तुपाठच आहे. परिक्रमेची पूर्वतयारी, काळजी, अनुभव, संकटे आणि समाधान अशी समग्र माहिती पुस्तकात आहे
पर्यटकांसाठी खूशखबर; नाशिक रोड रेल्वे स्टेशनमध्ये सुसज्ज पेड एसी वेटिंग रूम नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वेस्थानकात आउटसोर्सिंग तत्त्वावर पेड एसी वेटिंग रूम (व्हीआयपी लाउंज) सुरू होणार आहे. तिकीट बुकिंग ऑफिसच्या वरच्या जागेत सर्व सोयींनी युक्त अशी ही रूम साकारण्यात येत असून, प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
मथुरेत होतेय जगातील सर्वांत उंच धार्मिक इमारत - चंद्रोदय मंदिर जगातली सर्वांत उंच धार्मिक इमारत म्हणून प्रस्तावित असलेल्या, मथुरेतल्या वृंदावन येथे बांधल्या जात असलेल्या चंद्रोदय मंदिराचे हे संकल्पचित्र!

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language